Belagavi

बेळगावातील नाडहब्ब कार्यक्रमात भारताचा सांस्कृतिक वारसा यावर विशेष व्याख्यान

Share

बेळगावमध्ये सुरु असलेल्या नाडहब्ब कार्यक्रमात ” भारताचा सांस्कृतिक वारसा ” यावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते .

बेळगाव येथील कन्नड साहित्य भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात डॉ. एच.बी. राजशेखर, जिनदत्त देसाई सुभाष एनगी , बसवराज गार्गी, शबाना अंनिगेरी, शैलजा तलवार , माला अक्कशेट्टी , ममता शंकर आदी सहभागी झाले होते.

एम एस इंचल यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला . रेखा हेगडे यांचा नृत्य कार्यक्रम पार पडला . सुनीता पाटील नाडगीत सादर केले .

नाडहब्ब महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी ” भारताचा सांस्कृतिक वारसा ” या विषयावर व्याख्यान झाले. प्रशांत पल्लेद यांचे भारताच्या सांस्कृतिक पैलूंवर विशेष व्याख्यान झाले.भारत देशाविषयी बोलताना ते म्हणाले की, प्राचीन भारताची व्याप्ती विस्तारलेली होती . उत्तरेला सध्याचा इराण आणि दक्षिणेला सिंगापूरपर्यंत आणि रत्नाकर नावाचा राजा त्यावेळी राज्य करीत होता.

सुनीता पाटील, सोमलिंग माविनकट्टी एम.एस. इंचल, रेखा हेगडे , रवी दंडगी, नदीमा सनदी, दिलीप हेगडे , इंदिरा मोटेबेन्नूर उपस्थित होत्या

Tags: