Belagavi

बेळगावमध्ये अपूर्व उत्साहात सहाव्या दिवशीची दुर्गामाता दौड

Share

देव, देश आणि धर्माच्या रक्षणाचा ध्यास घेऊन नवरात्रानिमित्त काढण्यात येत असलेल्या दुर्गामाता दौडला बेळगावात आज सहाव्या दिवशी दिवशीही प्रचंड प्रतिसाद लाभला. या दौडीत हजारोंच्या संख्येने लहान मुले-मुली, युवक-युवती आणि महिला-पुरुषांचा लक्षणीय सहभाग होता .

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे नवरात्रात काढण्यात येणाऱ्या दुर्गामाता दौडीचा आज सहावा दिवस. गेल्या पाच दिवसांप्रमाणेच आज सहाव्या दिवशीही दौडीला बेळगावकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. पांढरे शुभ्र कपडे, टोप्या, भगवे फेटे घालून हाती भगवे ध्वज घेऊन धारकरी दौडीमध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या सळसळत्या उत्साहाने दौड काढण्यात आलेल्या परिसरात सर्वत्र चैतन्यमयी वातावरण निर्माण झाले होते.

आजच्या नवरात्राच्या सहाव्या दिवशीच्या दौडला श्री दुर्गामाता मंदिर खासबाग येथून प्रारंभ झाला . भरतनगर क्रॉस क्रमांक एक , नाथ पै सर्कल , डबल रोड , बसवेश्वर सर्कल , बाजार गल्ली , मरगम्मा मंदिर , भारतनगर पाचवा क्रॉस , चौथा क्रॉस , रयत गल्ली , सपार गल्ली , दत्त गल्ली , सोनार गल्ली , वडगाव मेन रोड , बाजार गल्ली , मारुती मंदिर , तेग्गीन गल्ली , जुने बेळगाव रोड ,गणेशपेठ गल्ली , कुलकर्णी गल्ली , कोरवी गल्ली , संभाजी गल्ली , लक्ष्मी गल्ली , बस्ती गल्ली , खन्नूरकर गल्ली , चावडी गल्ली , रामदेव गल्ली , नाझर कॅम्प क्रॉस क्रमांक ३ , हरिजनवाडा , हरीमंदिर , विठ्ठल मंदिर , वझे गल्ली , धामणे रोड, विष्णू गल्ली , कारभार गल्ली , आनंदनगर ,, पाटील गल्ली , धर्मवीर संभाजी नगर , पाटील गल्लीतील मंगाई मंदिर येथे दुर्गामाता दौडची सांगता झाली.

दौडच्या मार्गावर महिलांनी सुबक रांगोळ्या काढल्या होत्या. तर ठिकठिकाणी फुलांची उधळण करून दौडीचे स्वागत जल्लोषात करण्यात आले. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित सजीव देखावे साकारण्यात आले होते. महिलांनी भगव्या ध्वजाला आरती ओवाळून दौडीचे स्वागत केले.

दरम्यान इन न्यूजशी बोलताना माजी महापौर मधुश्री पुजारी यांनी सांगितले कि , रामदेव गल्ली वडगाव मध्ये दरवर्षीप्रमाणे , यंदाही मोठ्या उत्साहात दुर्गामाता दौडचे आयोजन करण्यात आले आहे . महिला मंडळ , युवक मंडळासहित गल्लीतील सर्वनागरिक अबालवृद्ध यात सहभागी झाले आहेत .

छत्रपती शिवरायांची परंपरा आम्ही टिकणारानी पुढच्या पिढीला देखील आम्ही हा बोध देणार . यावर्षीची दौड खूप मोठ्या प्रमाणावर आहे . गल्लीत आम्ही ९ दिवस दांडियाची तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करतो . याला प्रतिसाद देखील खूप चांगला मिळतो .

वडगाव येथील कल्याणनगर येथील रहिवासी संगीता कुंटे यांनी सांगितले कि , २५ वर्षांपासून , आम्ही ही दौड उत्साहात साजरी करीत आहोत . या नऊ दिवसात खूप उत्साह असतो . तरुणी आणि महिलांनी या दौडीत सहभाग घेतला पाहिजे .

तर बाजार गल्लीतील मनीषा नामक महिलेने सांगितले कि , या दुर्गामाता दौडची आम्ही दरवर्षी आतुरतेने वाट पाहत असतो . गल्लीत सुबक रांगोळ्या घातल्या आहेत . लहान मुले देखील या दौडीत सहभागी झाली आहेत . हिंदू संस्कृती जपण्यासाठी अशा दौडमध्ये मोठ्या संख्यने सहभागी व्हायला हवे .

तर अंबिका कुंटे यांनी आम्ही २५ वर्षांपासून या दौडमध्ये सहभागी होत आहोत . भक्तिभावाने नऊ दिवस पूजा करतो . आमच्या घरातील सर्वजण दौडीत सहभागी होतात असे सांगितले .
दरम्यान, दौड निघालेल्या परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. दौडीसोबत पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
उद्या काँग्रेस रोड येथील शिवतीर्थ येथून दौडची सुरुवात होणार आहे . तर कॅम्पमधील विविध भागात फिरून , जत्ती मठात दौडची सांगता होणार आहे

Tags: