कागवाड तालुक्यातील उगार बुद्रुक गावातील माजी आमदार मोहनराव शहा यांच्यासह अन्य चार शेतकऱ्यांच्या उसाच्या शेतात शॉर्टसर्किटमुळे आग लागून 30 एकर उसाचे शेत जळून खाक झाले.

बुधवारी सकाळी उगार-कुसनाळ गावाच्या मध्यभागी माजी आमदार मोहनराव शहा यांच्यासह विवेक शहा, प्रेम हुसुरे, कुमार निडगुंदी , परमजित निडगुंदी , शांतू निडगुंदी यांच्या उसाच्या शेताला आग लागली.
याची जबाबदारी हेस्कॉम विभागाची असून, हेस्कॉम विभागाने तातडीने या नुकसानीवर कारवाई करून जळालेला व नष्ट झालेला ऊस लवकरात लवकर पोहोचवून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी केली आहे.


Recent Comments