चालकाचे नियंत्रण सुटल्याने स्लीपर कोच बस उलटल्याची घटना हुबळी बाहेरील भागात घडली आहे .

हुबळी तालुक्यातील पाळाजवळ राष्ट्रीय महामार्गावर पहाटेच्या सुमारास बस उलटली आणि काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत . . हे प्रवासी बेंगळुरूहून बेळगावला जात होते
सीबर्ड स्लीपर कोच बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटली.
बसमधील काही प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित प्रवासी रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत आहेत. ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपासणी केली आहे.
Recent Comments