Dharwad

धारवाड येथे कित्तूर उत्सवाच्या वीर ज्योतीचे आगमन

Share

कित्तूर राणी चन्नम्मा जयंतीनिमित्त बेळगाव सवदत्ती तालुक्यातील कित्तूर राणी चन्नम्मा वीर ज्योतीचे धारवाड जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आगमन होताच जिल्हाधिकारी गुरुदत्त हेगडे यांनी स्वागत केले.

जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी कित्तूर राणी चन्नम्मा वीरा ज्योतीचे कला पथकासह स्वागत केले तर जिल्हाधिकारी गुरुदत्त हेगडे यांनी ज्योतीचे पूजन केले . यावेळी अपर जिल्हाधिकारी गीता सी.डी., कन्नड व सांस्कृतिक विभागाचे सहाय्यक संचालक कुमार बेक्केरी यांच्यासह समाजाचे नेते व मान्यवर उपस्थित होते. यावेळी धारवाड जिल्ह्यातील सर्व समाजबांधव व कित्तूर राणी चन्नम्मा यांचे चाहते उपस्थित होते.

Tags: