Belagavi

महानगरपालिकाची मराठी फलकावर वक्रदृष्टी कन्नडला प्रथम प्राधान्य न देणाऱ्या मालकांना नोटीस

Share

महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी स्वत: पाहणी करून महानगर महामंडळाच्या अखत्यारीतील मोठ्या दुकानांच्या नेमप्लेटमध्ये कन्नडला प्रथम प्राधान्य न देणाऱ्या मालकांना नोटीस बजावली आहे.

बेळगाव शहरात व्यवसाय करणाऱ्या दुकानांवर ६० टक्के नेमप्लेट्स कन्नड भाषेत लावल्या जाव्यात, असा नियम असतानाही आयुक्त दुडगुंटी यांनी , बड्या दुकानदारांना जे कन्नडला प्राधान्य न देता इंग्रजी आणि मराठी भाषेला प्राधान्य देतात त्यांना याबाबत नोटीस बजावली आहे . .
शहरातील चन्नम्मा सर्कल, गणपती गल्ली, बिम्स समोरील रोडसह विविध ठिकाणच्या कपड्यांच्या दुकानांच्या मालकांना कडक ताकीद देऊन दुकानासमोरील फूटपाथवर बेकायदेशीरपणे व्यवसाय करणाऱ्याना देखील कडक ताकीद दिली आहे .
महसूल अधिकारी अनिल शेट्टर , रेश्मा तालिकोटी ,आणि अतिक्रमण हटाव मोहिमेच्या कर्मचाऱ्यांनी यांनी महापालिका आयुक्तांना या कारवाईत सहकार्य केले.

धर्मवीर संभाजी महाराज चौकात महानगरपालिकेने अचानक पणे व्यावसायिक आस्थापनावरील मराठी फलक तसेच सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ गणेशोत्सव मंडळाचे फलक हटवण्याही मोहीम सुरु केली, सदर बातमी कळताच युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी धाव घेऊन महानगरपालिकेची मोहीम अडविली.


उपस्थित महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बेकायदेशीर मोहीम राबवून कायद्याचे उल्लंघन का करत विचारणा करीत अधिकाऱ्यांना घेराव घातला, २०१४ साली कर्नाटक उच्च न्यायालयाने व्होडाफोनने दाखल केलेल्या याचिकेवर निकाल देताना कर्नाटक सरकारने फलकाचा ६०% भाग हा कानडी भाषेत असावा हा कायदा भारतीय राज्य घटनेचे कलम १३ व १९ चे उल्लंघन असल्याचे सांगत हा कायदा कर्नाटक उच्च न्यायालयाने बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला होता, अशी माहिती देत उच्च न्यायालयांच्या आदेशाची प्रत अधिकाऱ्यांना दाखविताच अधिकारी नरमले तसेच अल्पसंख्याक आयोगाने

महानगरपालिकावर मराठी फलक लावण्याच्या संदर्भात अजून का कार्यवाही केली नाही, असे विचारणा करताच अधिकारी निरुत्तर झाले, आणि प्रकरण अंगाशी येत असल्याचे ओळखून मोहीम गुंडाळून काढता पाय घेतला. महानगरपालिकेने अशी मोहीम पुन्हा सुरु केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला यावेळी नगरसेवक शिवाजी मंडोळकर युवा समिती अध्यक्ष अंकुश केसरकर, शुभम शेळके, आनंद चौगुले प्रथमेश शिंदे विशाल गवळी आदी उपस्थित होते.

Tags: