Belagavi

वेदांत फाउंडेशनचा उपक्रम : दसरा झाला हसरा उपक्रम

Share

ऐन नवरात्रोत्सव व दसरा सणाची सुट्टी आपल्या घरात किंवा इतर ठिकाणी फिरून व्यर्थ घालण्या ऐवजी सुट्टी एका विधायक कार्याने साजरी करत वेदांत फौंडेशनने खानापूर तालुक्यातील घनदाट जंगलात वसलेल्या अती दुर्गम व आर्थिक मागास भागातील कमतगे जवळील भटवाडा गावात जाऊन साजरी करणे इतरांसाठी आदर्श आहे असे गौरवोद्गार बेळगाव शहर क्षेत्रशिक्षणाधिकारी कार्यालयातील नागराज कोलकार यांनी काढले.

 

पुढे बोलताना ते म्हणाले की आतापर्यंत वेगवगळ्या उपक्रमांतर्गत समाजात आपला एक वेगळा ठसा उमटविलेल्या शिक्षकांच्या व समाज सेवकांच्या गृपचे कार्य कौतुकास पात्र आहे .
यावेळी गावातील लोकांनी वेदांत फौंडेशनच्या स्वागतासाठी सडा सारवण करत रांगोळ्या काढल्या व शाळेच्या आवारात छानसा मंडप घालून वेदांत फौंडेशनच्या सदस्यांची मने जिंकली .

खास दसरा सणाचे निमित्य साधत दसरा झाला हसरा या उपक्रमांतर्गत खानापूर तालुक्यातील अती दुर्गम भागात जंगलात वसलेल्या कमतगे भटवाडा गावातील लोकांना उत्तम दर्जाचे ब्लँकेट व मिठाई तसेच चिक्किचे वाटप करण्यात आले
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नेहमीच मदत करणारे दानशूर व्यक्ती महेश फाउंडेशनचे महेश जाधव यांनी बसची व्यवस्था केली ,
गावातील अठ्ठाविस कुटुंबांना कारगील युद्धात शहिद झालेले भरमा शिंदे यांच्या पत्नी वीर नारी लिला भरमा शिंदे व कुटुंबिय शिंदोळी यांच्याकडून उत्तम दर्जाचे ब्लँकेट ,प्रशांत बिर्जे सर मुख्याध्यापक कॅन्टोन्मेंट बोर्ड बेळगाव ,श्री कल्लाप्पाण्णा हनुमंत कदम बिल्डींग कॉन्ट्रॅक्टर दोडामार्ग महाराष्ट्र आणि


श्रीमती कविता पुराणीक मुख्याध्यापिका महिला विद्यालय यांच्याकडून गावकऱ्यांना मिठाई व चिक्कीचे वाटप करण्यात आले.तसेच सुशिला तारीहाळकर, मधुबाला देसाई, किर्ती पाटील, . वर्पे यांच्या आर्थिक सहकार्यातून समाज सेवा पार पडली.
खानापूर पासून 18 किलोमिटर दूर अंतरावर व मुख्य रस्त्यापासून 5 किलोमिटर अंतरावर घनदाट जंगलात वसलेल्या या गावात कोणतीही वाहन व्यवस्था नाही, चांगला रस्ता नाही , पाण्याची व्यवस्था नाही त्यामुळे सर्रास मुले गावात 5 वी पर्यंत चे शिक्षण घेवून गावातच राहतात. मोठी झाल्यावर गवंडी किंवा इतर कामासाठी गोवा किंवा इतर ठिकाणी जातात परंतु अशातच जीव मुठीत घेऊन ऋतुजा शहापूरकर नावाची मुलगी जंगलातुन वाट काढत एकटीच कशीबशी खानापूर पर्यंत पोहचत 12 वी पर्यंत चे शिक्षण पूर्ण करते व वडीलांच्या

 

निधनामुळे शिक्षण अपूर्ण होते परंतु ऋतुजाच्या धाडसामुळे सध्या पुन्हा दोन मुली खानापूरला कॉलेजला जात असल्याचे कळाले ही दृष्य व परिस्थिती पाहून वेदांत फौंडेशन चे अध्यक्ष सतीश पाटील , सचीव ईश्वर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी ऋतुजा शहापूरकर या मुलीच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची तयारी दाखवली आहे .
गावच्या वतीने रेणूका चौगुले व सुवर्णा लोटुलकर यांनी गावच्या समस्या मांडल्या .
याप्रसंगी गावकऱ्यांनी सर्वांसाठी पुरणपोळी जेवणाचा बेत आखला होता .


यावेळी जयश्री पाटील , एन डी मादार ,सुनिल पाटील ,रघुनाथ उत्तुरकर , विद्याधर यादव यांची समयोचीत भाषणे झाली .
याप्रसंगी अनुराधा तारीहाळकर , मंगल शेटवाल , विश्वनाथ पाटील , रविंद्र गुरव उपस्थित होते .

Tags: