Vijayapura

रेशनच्या तांदुळाची अवैध वाहतूक : 930 किलो तांदूळ जप्त

Share

अवैध रेशन तांदूळ वाहतुकीवर पोलिसांनी छापा टाकल्याची घटना विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील सालोटगी रस्त्यावर घडली.

आफताब शेख, समीर बागवान, सादिक सुंबड, सय्यद सुंबड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपी 930 किलो तांदूळ एका टमटम गाडीत घेऊन जात असताना, पोलिसांनी काही माहितीच्या आधारे छापा टाकून तांदूळ जप्त केला.

याप्रकरणी इंडी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: