Kagawad

शेतामध्ये जाण्याचा रस्ता बंद झाल्याने शेतकऱ्यांनी केला रास्ता रोको

Share

बांधण्यात येत असल्याने हजारो शेतकऱ्यांचा त्यांच्या शेतात जाण्याचा रस्ता बंद झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी उगार येथे रास्ता रोको केला

मंगळवारी हजारो शेतकऱ्यांनी उगार-ऐनापूर मार्गावरील रेल्वे पुलावर जमून रास्ता रोको केला.
रेल्वे विभागातर्फे उगारमध्ये रेल्वेवर पूल बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून, हा पूल बांधल्यास अनेक शेतकरी व जनतेला त्यांच्या शेतात व घरांना जोडण्याचा रस्ताबंद होणार असल्याची

माहिती स्थानिकांनी दिली. मात्र विभागाने या असुविधेकडे विभागाने दुर्लक्ष केले.
आमदार राजू कागे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन रस्त्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. या दिरंगाईमुळे येथील जनतेने रास्ता रोको करून संताप व्यक्त केला.

रेल्वे विभागाच्या हुबळी विभागाचे अभियंता नाईक यांनी त्यांना निवेदन दिले. त्यानी विनंती मान्य करून काही दिवसात तुमची समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
वकील बी.आर.राव, मंजुनाथ कलाल, अप्पासाहेब कुंभार, मोहन वैदू, विनायक कांबळे, विकास थोरुशे, प्रताप जत्राटे आदी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांशी वाद घातला व प्रश्न सोडविण्याची विनंती केली. अथणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे दयानंद हिरेमठ यांनी स्थानिकांच्या समस्या ऐकून घेतल्या.

Tags: