चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावातील निवृत्त सैनिक प्रदीप पाटील यांनी 22 वर्षे भारत मातेची सेवा केल्यानंतर निवृत्त होऊन त्यांच्या गावी पोहोचताच त्यांचे खुल्या वाहनातून भव्य स्वागत करण्यात आले.


जम्मू काश्मीर लडाक, पंजाब, दिल्ली, पुणे, मद्राससह देशाच्या विविध भागात २२ वर्षे देशसेवा केल्यानंतर ते निवृत्त झाले. आज ते आपल्या गावी परतले . यावेळी त्यांची गावातील प्रमुख मार्गावर मोकळ्या वाहनातून मिरवणूक काढून भारत माता की जय, वंदे मातरमचा जयघोष करीत ग्रामस्थांनी भव्य स्वागत करून सत्कार केला .
शिक्षिक आर.डी.कांबळे म्हणाले की, गेली 22 वर्षे मातृभूमीची सेवा करून , निवृत्त होऊन , सैनिक प्रदीप पाटील आज गावात दाखल झाल्यामुळे येत्या काही दिवसात अनेक तरुणांना सैन्यात भरती होण्यासाठी त्यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. .
त्यानंतर नेते शंकर पवार बोलत होते आणि म्हणाले की प्रदीप पाटील 22 वर्षे प्रदीर्घ देशसेवा करून गावात आले आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे.
22 वर्षे देशाची सेवा केलेले निवृत्त सैनिक प्रदीप पाटील हे तरुणांना सैन्यात भरती होण्याबाबत मार्गदर्शन करतील आणि युवकांसाठी आदर्श सैनिक ठरतील अशी अपेक्षा आहे.


Recent Comments