Belagavi

अन जिल्हाधिकाऱ्यांनी केला चक्क बसमधून प्रवास !

Share

जिल्हाधिकारी म्हटले की, लाल दिव्याची सरकारी गाडी, पोलीस सुरक्षा, वाहनचालक असे चित्र नजरेसमोर येते. पण या सगळ्याला छेद देत बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी आज चक्क केएसआरटीसीच्या सरकारी बसमधून प्रवास करून सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला.

होय, खानापूर तालुक्यातील नंदगड येथे आयोजित “जनता दर्शन” कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या नेतृत्वाखालील जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या पथकाने आज सकाळी राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून बेळगाव ते नंदगड असा प्रवास केला. जनतेच्या तक्रारी ऐकून स्थानिक पातळीवरील समस्यांचे निराकरण करण्यासाठी नंदगड येथे जिल्हाधिईकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जनता दर्शन कार्यक्रम आयोजित केला होता.

त्यासाठी ते अधिकाऱ्यांसमवेत बसने गेले. कंडक्टरकडून नियमानुसार तिकीट घेऊन जिल्हाधिकारी व अन्य अधिकारी बसमध्ये चढले. महिला अधिकाऱ्यांनी मात्र शक्ती योजनेंतर्गत मोफत प्रवास केला. यावेळी अपर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी व अन्य अधिकारी उपस्थित होते.

Tags: