बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या नावाने तीन बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.
होय, सायबर भामट्यांचा उपद्रवकारक कारभार समोर आला आहे. त्यांनी चक्क महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या नावाने तीन बनावट इंस्टाग्राम अकाउंट उघडल्याचे उघडकीस आले आहे.
याप्रकरणी सायबर क्राईम पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात येणार आहे. जनतेने अशा खात्यांबाबत सावधगिरी बाळगली पाहिजे असे आवाहन महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी
यांनी प्रसिद्धीपत्रकात केले आहे. दरम्यान, या घटनेने शासकीय अधिकारी-कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे.


Recent Comments