आठवड्यातून एक दिवस कृष्णा नदीच्या पाण्याचा वापर बंद करण्यात येणार असून, उन्हाळ्यात पाणी टंचाई भासू नये यासाठी सरकार हा विचार करत आहे असे आमदार लक्ष्मण सवदी यांनी सांगितले.

अथणी तालुक्यातील नागनूर पीके गावात बोलताना सवदी म्हणाले की, आठवड्यातून एक दिवस नदीचे पाणी वापरणे बंद करूया. उन्हाळ्यात पाणी बचतीसाठी शासनस्तरावर विचार सुरू असून, दोन जिल्ह्यांच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची पुढील आठवड्यात बैठक होणार आहे. त्या बैठकीत जलसंधारणावर चर्चा होणार असून, शेतकऱ्यांनी या निर्णयाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, सवदी यांच्या सल्ल्यानंतर लोक मात्र चिंतेत आहेत, शेतकऱ्यांना आणखी एक धक्का देण्याची सरकारची तयारी आहे का? आठवड्यातून एक दिवस संपूर्ण ब्लॅकआउट? नदीकाठच्या शेतकऱ्यांना हादरा देण्याचा सरकारचा विचार आहे का?, अशी शंका उपस्थित होत आहे.


Recent Comments