Khanapur

नंदगडमध्ये बुधवारी ‘जनता दर्शन’चे आयोजन

Share

ऐतिहासिक नंदगड गावात येत्या बुधवारी खानापूर तालुकास्तरीय ‘जनता दर्शन’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. जनतेच्या विविध तक्रारींवर अधिकारी तोडगा काढणार आहेत. त्याचा चांगला उपयोग करून घेण्याचे आवाहन तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी केले आहे.

खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक नंदगड गावात बुधवार दि. 18 ऑक्टोबर रोजी आयोजित जिल्हास्तरीय जनता दर्शन कार्यक्रमात जनतेच्या विविध तक्रारींवर जागीच तोडगा काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहून जनतेने आपल्या तक्रारी मांडून त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी केले आहे.

यावेळी पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले की, जनतेच्या समस्या जागेवरच सोडविण्याच्या उद्देशाने आपल्या खानापूरमध्ये प्रथमच शासनाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. जिल्हा प्रशासनासह सर्व विभागांचे अधिकारी खानापूर तालुक्यातील रायण्णा नंदगड येथे येणार आहेत

जनता दर्शन कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनी केले.

Tags: