बेळगावात दिवसाढवळ्या फिल्मी स्टाईलने दरोड्याचा प्रयत्न केल्याची घटना आज सकाळी घडली. शाहुनगरातील संतोषी ज्वेलर्सच्या मालकाला पिस्तूल दाखवून लुटण्याचा प्रयत्न दरोडेखोरांनी केला. मात्र मालकाने कडवा प्रतिकार केल्याने दरोडेखोरांनी पलायन केले.
होय, बेळगावात भरदिवसा फिल्मी स्टाईलने पिस्तुलाचा धाक दाखवून ज्वेलर्सचे दुकान लुटण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली. शाहुनगर येथील संतोषी ज्वेलर्सचे सोन्याचे दागिने दुकान दोन अज्ञात व्यक्तींनी पिस्तूलचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न केला. दुकान मालक प्रशांत याच्याशी हाणामारी केली. त्यांच्या डोक्यात कानाच्या वर जड वस्तूने प्रहार केल्याने ते जखमी झाले. मात्र मालकानेही लढवा प्रतिकार करत त्यांना प्रत्युत्तर दिले. त्यामुळे दरोडेखोर पळून गेले. शहर पोलिस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा यांनी घटनास्थळी भेट देऊन एपीएमसी पोलिस कर्मचाऱ्यांसह पाहणी केली.
या घटनेबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना शहर पोलीस आयुक्त डॉ. एस. एन. सिद्धरामप्पा यांनी सांगितले की, नेहमीप्रमाणे सकाळी 9वाजता संतोषी ज्वेलर्सचे मालक प्रशांत यांनी दुकान उघडून साफसफाई करत असताना दोन अज्ञात व्यक्तींनी येऊन मालकाला पिस्तुल दाखवून चोरीचा प्रयत्न केला. त्यांनी दुकान मालकाशी मारामारी करून दुकान मालकाला किरकोळ दुखापत करून तेथून पळ काढला. आरोपींचा सुगावा लागला असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. बाइट
दरम्यान मालक प्रशांत होनराव यांचे बंधू संतोष यांनी घटनेबाबत प्रसारमाध्यमांना माहिती दिली.
दरम्यान, डीसीपी जगदीश रोहन, स्नेहा पी.व्ही. एसीपी नारायण बरमनी आदी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. जखमी सराफ प्रशांत होनराव यांच्यावर इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपीना लवकरच अटक करू असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Recent Comments