अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर चिक्कोडी येथे भाजप जिल्हा संघटनच्या वतीने राज्य काँग्रेस सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.

चिक्कोडी शहरातील भाजप कार्यालयापासून सुरू झालेला मोर्चा बसव सर्कलवर नेण्यात आला . तेथे भाजप कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला. यावेळी खासदार अण्णासाहेब जोल्ले म्हणाले की, अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकऱ्यांनी पिकवलेले पीक सुकत चालले आहे.सध्या २४ तास वीज पुरवठा मिळत नाही.या पार्श्वभूमीवर त्यांनी सात तास वीजपुरवठा करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या पंप संचाला वीज पुरवठा करण्यात यावा, याशिवाय विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी योग्य वीजपुरवठा होत नसल्याबद्दल त्यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला.
त्यानंतर माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ म्हणाले की, काँग्रेस सरकार खोटी आश्वासने देऊन सत्तेत आले आहे. मोफत वीज देऊ असे सांगून कर्नाटकला अंधारात टाकले आहे. मागील 2 महिन्यांपासून 1 तास वीज देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घेतलेली पिके सुकली असून, राज्य सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. पुरेशी वीज न दिल्यास सर्व शेतकरी बेंगलोर चलो पुकारतील, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.

त्यानंतर आंदोलनस्थळी आलेले उपविभागीय अधिकारी सुभाष संपगावी यांनी भाजप कार्यकर्त्यांचे आवाहन स्वीकारले.
यावेळी आमदार शशिकला जोल्ले, दुर्योधन ऐहोळे, चिक्कोडी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश नेर्ली, मंडळ अध्यक्ष संजय पाटील, चिदानंद साखर कारखान्याचे संचालक भरतेश बनवणे, अजित देसाई, रयत राज्य मोर्चाचे उपाध्यक्ष दुंडाप्पा बेंडवाडे , रवी हंजी, सतीश अप्पाजीगोळ , बंडा घोरपडे, जयवंत भाटले , सुरेश बेल्लद , शांबवी अश्वपुर, शकुंतला डोणवडे, राजू हरगापुरे, संजू आरगे यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते.आदी उपस्थित होते.


Recent Comments