शेकडो वर्षांचा इतिहास असलेल्या गोकाक तालुक्यातील अरभावी मठ, दुरदुंडेश्वर सिद्धसंस्थान मठाचे श्री सिद्धलिंग महास्वामीजी (६४) हे लिंगैक्य झाले आहेत.

मठात असताना स्वामीजींच्या छातीत दुखू लागल्याने सेवकांनी त्यांना ताबडतोब गोकाकच्या खासगी दवाखान्यात दाखल केले, पण उपचार निष्फळ ठरले. रुग्णालयातच स्वामीजींची प्राणज्योत मालवली.
स्वामीजींचे कर्नाटकातच नव्हे तर इतर राज्यातही प्रचंड भक्त आहेत. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच हजारो भाविक, पोलीस आणि तालुका अधिकारी गोकाक येथील आदिजांबव नगरातील खासगी रुग्णालयाकडे रवाना झाले. हॉस्पिटलच्या आवारात शेकडो भाविकांनी जमून शोक व्यक्त केला. विविध मठाधीशांच्या उपस्थितीत आज सायंकाळी सहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे
Recent Comments