शारदीय नवरात्रोत्सवाचा एक भाग म्हणून बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती यल्लम्मा मंदिरात घटस्थापना करण्यात आली.

देशातील शक्ती देवतांपैकी एक असलेल्या सवदत्ती यल्लम्मा देवीची आज विशेष पूजा सजावट आणि अभिषेक करून घटस्थापना करण्यात आली.
या संबंधी इन न्यूजचे रिपोर्टर राजू बागलकोटी यांनी दिलेला हा खास रिपोर्ट
सवदत्ती इल्लम्मा मंदिरात आल्यानंतर हजारो भाविकांनी आज सकाळी देवीचे दर्शन घेऊन दिव्याला तेल अर्पण केले, नवरात्रीचा पहिलाच दिवस आणि त्यात रविवार सुटीचा दिवस असल्याने, रुंक यल्लमा मंदिरात भाविकांचा महापूर लोटला होता .
यासंदर्भात बोलताना , मंदिराचे मुख्य पुजारी म्हणाले की, शारदीय नवरात्री निमित्त देवीला नऊ दिवस सजविले जाणार असून, दिवे लावले जाणार आहेत, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सर्व व्यवस्था केली आहे, शेवटच्या दिवशी सीमोल्लंघन करण्यात येऊन दसरा साजरा करण्यात येईल .
आजपासून नऊ दिवस चालणाऱ्या दसरा उत्सवाच्या पहिल्या दिवशी पहाटेपासूनच हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी आले असून देवीचे दर्शन घेण्यासाठी रांगेत उभे होते.


Recent Comments