Belagavi

बेळगावात रौप्य महोत्सवी दौडीचा अपूर्व उत्साहात प्रारंभ

Share

देव ,देश आणि धर्मासाठी प्रेरणा जागृत करणारी दुर्गामाता दौड आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर प्रारंभ झाली . पहिल्याच दिवशी सळसळत्या उत्साहासह हजारो धारकरी , महिला आणि बालगोपाळ अगदी पहाटेच या दौडीत सहभागी झाले . जय शिवाजी , जय भवानी , हरहर महादेव च्या गजराने आसमंत दुमदुमून गेला होता .

व्हॉइस ओव्हर : बेळगावात आजपासून रौप्यमहोत्सवी दुर्गामाता दौडीला अपूर्व उत्साहात प्रारंभ झाला . बेळगावमधील छत्रे वाड्यातील , छत्रे गुरुजींच्या हस्ते या दौडीचे पूजन करून ,आणि ध्वज चढवून दौडीचा शुभारंभ करण्यात आला .
या दौडीच्या मार्गावर , फुलांच्या आकर्षक रांगोळ्या घालण्यात आल्या होत्या . लहान मुले बालशिवाजी , जिजाऊ च्या वेशात अगदी दिमाखात उभी होती . जागोजागी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ , अश्वारूढ मुर्त्यांचे पूजन करण्यात आले होते .

महिलांनीदेखील अतिशय मेहनत घेऊन , दौडीचा मार्ग रांगोळ्यांनी सजवला होता . आणि त्या दौडीचे स्वागत करण्यासाठी सज्ज होत्या . दौडीचे स्वागत करणाऱ्या शास्त्रीनगर येथील एका भगिनीने सांगितले कि , दरवर्षीप्रमाणे , आमच्या भागातील बंधुभगिनी तसेच बाळगोपाळांने दौडीच्या स्वागतासाठी सहकार्य केले आहे . या दौडीमुळे अभिमान आणि उत्साह वाढत आहे . हिंदू धर्मात जन्माला आल्याचा अभिमान वाटतो . आम्ही आमची परंपरा जोपासण्याचा प्रयत्न करीत आहोत असे सांगितले . ( )
या दौडीत हजारोंच्या संख्येने धारकरी , महिला आणि तरुणी , लहान मुले सहभागी झाली होती . ठिकठिकाणी दौडीवर पुषवृष्टी करण्यात येत होती . दौडीच्या ध्वजाचे सुवासिनी पूजन करीत होत्या

यासंदर्भात इन न्यूजला माहिती देताना शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे बेळगावचे अध्यक्ष किरण गावडे यांनी सांगितले कि , २५ वर्षांपूर्वी ह्या दुर्गामाता दौडीला प्रारंभ झाला . यंदाचे दौडीचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे . आजची संख्या तर प्रचंड आहेच पण आगामी दोन दिवसात ही संख्या आणखी वाढणार आहे . बेळगाव शहराचे वातावरण भगवेमय झाले आहे . प्रत्येक कुटुंब यात सहभागी होत आहे . विशेष करून महिला आणि मुलींचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे . हिंदू बांधवांचे प्रेम असेच पाठीशी राहावे अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या .

बेळगावचा छत्रे गुरुजींनी दौडीचा शुभारंभ करून ध्वज चढवला . या दौडीत भाग घेणाऱ्यांमध्ये राष्ट्रप्रेम वृद्धिंगत करण्यात येत आहे . राष्ट्रपती प्रत्येक नागरिकाने प्रेम करावे . दौडीचा हा उपक्रम संपूर्ण देशभरात व्हावा यासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न सुरु असल्याचे किरण गावडे यांनी सांगितले

शिवाजी उद्यानापासून सुरु झालेली ही दौड , हुलबत्ते कॉलनी , महात्मा फुले रोड , एसपीएम रोड , संतसेना रोड, पाटीदार भवन रोड , शास्त्री नगर , गुडशेड रोड , कपिलेश्वर कॉलनी , शास्त्रीनगर आठल्ये रोड , महाद्वार रोड , माणिकबाग रोड , समर्थ नगर , संभाजी गल्ली , एसपीएम रोड मार्ग जाऊन , कपिलेश्वर मंदिरात दौडीची सांगता करण्यात आली . अगदी पहाटेपासून सुरु झालेल्या या दौडीच्या पहिल्याच दिवशी धारकऱ्यांचा प्रचंड प्रमाणावर प्रतिसाद लाभला .

 

 

Tags: