Raibag

रायबाग तालुक्यातील दोघांनी अग्निवीर प्रशिक्षण केले पूर्ण : गावाकडून सत्कार

Share

रायबाग तालुक्यातील इटनाळ गावातील शूर योद्ध्यांचा युवा नेते मुत्तप्पा डांगे व त्यांच्या पथकाने सत्कार केला.

इटनाळ गावातील संगोळी रायण्णा वूलन उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष मुताप्पा डांगे आणि त्यांच्या सहकार्यांनी , अग्निवीर जवान म्हणून निवड झालेल्या शिव बसू डांगे व अर्जुन मारुती मारापुरे याचा पुष्पहार घालून शाल पांघरून सत्कार केला.
गावातील या दोन जणांची सैनिक म्हणून निवड झाली आहे ,

शिव बसू डांगे यांने जबलपूर येथे तर अर्जुन मारुती मारापुरे यांनी हैदराबाद येथे प्रशिक्षण पूर्ण केले . हातात ते देशसेवेत रुजू झाले आहेत . ही आमच्या गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे की एका गावातील दोन तरुणांची एका प्रयत्नात अग्नीवीर जावं म्हणून निवड झाली.

यावेळी युवा नेते मुत्तप्पा डांगे, विवेक मारापुरे, सिद्धप्पा ब्याकुड , भीमाशी मारापुरे, लक्ष्मण भांगी, मलकारी पुजारी, सिद्धप्पा अरबी आदी उपस्थित होते.

Tags: