Belagavi

बेळगावात श्री दुर्गादेवी मातंगी देवीचा पालखी सोहळा

Share

बेळगावातील कंग्राळ गल्लीत सालाबाद प्रमाणे यावर्षीही नवरात्राच्या आधी श्री दुर्गादेवी मातंगी देवीचा पालखी सोहळा कार्यक्रम भक्तिभावाने पार पडला.

बेळगावातील कंग्राळ गल्ली वाड्यात पारंपरिक पद्धतीने नवरात्राच्या आधी श्री दुर्गादेवी मातंगी देवीच्या पालखी सोहळ्याचे आयोजन केले होते. या निमित्त गुरुवारी रात्री ओटी भरणे तसेच अन्य विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर शुक्रवारी देवीची विशेष पूजा करून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आमदार राजू सेठ यानी देवीचे दर्शन घेतले. यावेळी आ. राजू सेठ आणि अमन सेठ यांचा पुष्पहार घालून विशेष सन्मान करण्यात आला.

हजारो भकतांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी ज्येष्ठ दलित नेते मल्लेश चौगुले, सिद्राय मेत्री, संतोष हलगेकर, बसू रायवगोळ यांच्यासहित श्री दुर्गादेवी मातंगी देवी यात्रा कमिटी सदस्य आणि नागरिक उपस्थित होते.

Tags: