किरकोळ वादातून धारदार विळ्यांने वार करून युवकाचा खून केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील गोजगा येथे शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.मारूती नाईक वय 32 राहणार नाईक गल्ली, गोजगा असे मयत व्यक्तीचे नाव आहे.
गेल्या अनेक वर्षापासून राजू बंडू नाईक (वय 32) व मारूती नाईक (वय 32) या दोघामध्ये सतत वाद होत असत. आजही किरकोळ कारणावरून वादाची ढिणगी पडली. वाद सुरू असतानाच राजू याने मारूती याच्या पोटावर धारदार विळ्याने वार केला. परिणामी मारूती यामध्ये गंभीर जखमी झाला.
मारूती याला दुचाकीवरून जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. अशी माहिती मारूती नाईक यांच्या कुटुंबाक़डून देण्यात आली. पोटावर अधिक मोठीं जखम झाल्याने रक्तस्त्रावरही अधिक झाला. परिणामी मारूती नाईक याचा प्राण गेल्याची माहीती परिवाराला डाॅक्टरांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच गावातील तरूणाची जिल्हा रूग्णालयाच्या समोर गर्दी झाली होती. या खूनासंदर्भात पोलिसाकडून तापस सुरू आहे.
Recent Comments