Kagawad

उगारमधील शेतकऱ्यांचे हेस्कॉम कार्यालयासमोर आंदोलन

Share

हेस्कॉम विभागाकडून गेल्या चार दिवसांपासून होत असलेल्या अपुऱ्या वीजपुरवठ्याच्या निषेधार्थ ऐनापूर व उगार भागातील शेतकऱ्यांनी हेस्कॉम कार्यालयाला घेराव घातला.

गुरुवारी तमन्ना परशेट्टी, राजेंद्र पोतदार, कुमार अपराज, संजय बिरडी या शेतकरी नेत्यांनी ऐनापूर येथील हेस्कॉम कार्यालयात येऊन २४ तास अखंड वीजपुरवठा करण्याची मागणी करीत , अधिकाऱ्यांना घेराव घातला. केवळ तीन तास वीजपुरवठा होत असून आमची पिके नष्ट होत असल्याचे सांगत त्यांनी सरकारविरोधात संताप व्यक्त केला. त्यानंतर अधिकाऱ्याने सर्व माहिती शेतकऱ्यांना दिली.

शेतकरी नेते तमन्ना परशेट्टी यांनी हेस्कॉम विभागाने घेतलेला निर्णय शेतकऱ्यांवर अन्यायकारक असल्याचे सांगून , पूर्वीप्रमाणेच वीज पुरवठा करण्यास सांगितले. येत्या सोमवारपर्यंत नागरिकांना पुरेसा वीजपुरवठा न केल्यास मंगळवारी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला. तसेच नेते राजेंद्र पोतदार यांनी देखील यावेळी सुरळीत वीज पुरवठ्याची मागणी केली .

हेस्कॉम विभागाचे अधिकारी डी.ए.माळी यांनी राज्यातील वीजनिर्मितीमध्ये अडचण येत असल्याने येथील शेतकऱ्यांना वीजपुरवठा करणे कठीण होत असल्याची माहिती देताना त्यांनी सर्व गावांना चार तास पुरेसा वीजपुरवठा करण्याचे आश्वासन दिले. आतापासून येत्या सोमवारपर्यंत बरेच बदल होऊन शेतकऱ्यांचा प्रश्न सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उगार येथील कार्यालयाला घेराव घालून हेस्कॉम विभागाचा निषेध करण्यात आला . अधिकारी डी.ए.माळी यांनी शेतकर्यांना आतापासून चार तास वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले परंतु शेतकरी नेते सुरेश चौघुले, वज्रकुमार मगदूम, बाहुबली आलाप्पनवर, बी.ए.घालीमट्टी यांच्यासह अनेक शेतकरी यावेळी उपस्थित होते . होते. हेस्कॉम विभागाचे अधिकारी व्ही.आर.सवदी , एम.एस. सवदी, सोमशा कल्लिकेतर हे शेतकऱ्यांना शांत करत होते.

Tags: