मंत्र्यांकडे तक्रार करताच अधिकाऱ्यांची धावपळ उडते अन ते कामाला लागतात याचा प्रत्यय आज बेळगावातील चन्नम्मा नगरात आला.
बेळगाव महानगरपालिकेच्या हद्दीतील प्रभाग 54 च्या काही भागाची विकासाची जबाबदारी बेळगाव नगरविकास प्राधिकरणाकडे आहे. येथील ४ उद्यानाच्या पुनर्विकासाची मागणी रहिवासी अनेक दिवसांपासून करत आहेत. मात्र त्याकडे बुडा अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट योजनेंतर्गत एकूण प्रभाग ५४ आहे.
बुडा प्रशासनाअंतर्गत जुलै 2022 पासून प्रभाग 54 मधील चार उद्यान पुनर्विकास करण्याबाबत रहिवाशी 3 कोटी रुपयांचा निधी वापरून अंदाजपत्रकानुसार योग्य विकास होत नसल्याबद्दल मागील 6 महिन्यांपासून पाठपुरावा करत होते. याबाबत पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे रहिवाशांनी तक्रार करताच बुडा अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
त्यानंतर अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. त्यांनी चन्नम्मानगरला भेट देऊन रहिवाशांशी यावर चर्चा केली. उद्यानांचे उर्वरित काम १५ दिवसांत पूर्ण करण्याचे आश्वासन बुडा प्रशासनाकडून देण्यात आले. अधिकाऱ्यांशी चर्चा करताना आर.सी.नगर प्लॉट मालक संघाचे अध्यक्ष प्रमोद गुंजीकर, प्रभाग 54 च्या कृती समितीचे अक्षयकुमार कुलकर्णी, अनिल चौगुले, सुनील होसमनी, अरुण पुणेकर, आणि संतोष बैकेइ आदी उपस्थित होते.


Recent Comments