Belagavi

मजगाव येथे जनावरांना लसीकरण

Share

जनावरांना होणारे आजार रोखण्यासाठी , बेळगाव तालुक्यातील मजगाव येथील पशू वैद्यकीय चिकित्सा केंद्रात जनावरांना लसीकरण करण्यात आले .

सध्या शेतकऱ्यांच्या गायी म्हशींना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे . त्वचेच्या गाठीच्या आजाराने अनेक गुरे तालुक्यात दगावली आहेत . जनावरांना या रोगापासून वाचवण्यासाटी पशु संगोपन खात्याकडून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली आहे . या अंतर्गत , मजगाव येथील ,

पशु वैद्यकीय चिकित्सा केंद्रात जनावरांचे लसीकरण करण्यात आले . यावेळी डॉ. बंटी , मनोज होंडदकट्टी , दीपक कोलकार , दर्शन पाटील तसेच शेतकरी आपापल्या जनावरांसह उपस्थित होते .

Tags: