National

काँग्रेस कार्यकारिणीचा देशव्यापी जात जनगणनेला पाठिंबा

Share

काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीने काँग्रेसशासित राज्यांमध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे असे नेते राहुल गांधी यांनी सांगितले.

दिल्लीत सोमवारी जातनिहाय जनगणनेसंदर्भात कॉंग्रेस कार्यकारिणीची महत्वाची बैठक पार पडली. बैठकीनंतर बोलताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी सांगितले की, कॉंग्रेस पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यांमध्ये जातनिहाय जनगणनेसाठी कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हा ऐतिहासिक निर्णय असल्याचेही त्यांनी सांगितले.
काँग्रेस कार्यकारिणीने एकत्रितपणे ऐतिहासिक निर्णय घेतला. राहुल गांधी म्हणाले की, आमच्या मुख्यमंत्र्यांनी हिमाचल प्रदेश, राजस्थान, कर्नाटक आणि छत्तीसगडमध्ये जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय देशातील गरीब जनतेच्या मुक्तीसाठी अत्यंत प्रगतीशील पाऊल आहे. हा निर्णय प्रेरीत नाही. धर्म किंवा जातीचा विचार न करता भारतातील आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांच्या फायद्यासाठी आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जातनिहाय जनगणनेला असलेला विरोध चुकीचा आहे असे मुख्यमंत्री सिद्दरामय्या यांनी म्हटले आहे. कायमस्वरूपी मागासवर्ग आयोगाचा अहवाल आधीच्या सरकारला सादर करणे हे आयोगाचे काम आहे. मात्र, सचिवांचीही स्वाक्षरी असल्याने त्यांनी अहवाल दिलेला नाही. ते अहवाल देतात का ते बघू. मी एकदा अहवाल मागवला होता. मात्र, तो अहवाल आमच्या सरकारला देण्यात आला नाही, असे ते सिद्धरामय्या म्हणाले.


कार्यकारिणी बैठकीला एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी-वद्रा, के. सी. वेणुगोपाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, हिमाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, सिद्दरामय्या आदी नेते हजर होते.

Tags: