Belagavi

काहेरच्या विध्यार्थ्यांकडून रेल्वे स्टेशन, बस स्टँडवर पथनाट्य

Share

‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ आणि मानसिक आरोग्य जागृती महिन्याच्या निमित्ताने समुपदेशन कक्ष आणि मानसशास्त्र विभाग केएलई अकादमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्चतर्फे “मुले आणि तरुणांमधील मानसिक आरोग्याच्या समस्या, शिकण्यातील अडचणी आणि आत्महत्या प्रतिबंध-स्वतःची, कुटुंबाची, शिक्षकांची आणि समाजाची भूमिका” या विषयावर पीजी विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले.

बेळगावातील रेल्वे स्टेशन आणि सेंट्रल बस स्टँडवर आज मानसशास्त्र विषय; मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि त्याचे व्यवस्थापन याविषयी जनजागृती करण्यासाठी कन्नड आणि हिंदी भाषेत जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आले. 200 हून अधिक लोकांनी हे नाटक पाहिले आणि मानसशास्त्राच्या प्राध्यापक संघाशी संवाद साधला.

समुपदेशन कक्षाच्या प्रमुख डॉ. यास्मिन, प्रा. भैरवी आणि काहेरच्या मानसशास्त्र विभागाचे विद्यार्थी या वेळी उपस्थित होते. मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि सेवा प्रदान करण्यासाठी समुदाय स्तरावर अनेक कार्यक्रम नियोजित आहेत. समुपदेशन कक्ष आणि मानसशास्त्र विभाग काहेरद्वारे मानसिक आरोग्य जागृती मासाचरणचा भाग म्हणून अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे असे काहेरचे रजिस्ट्रार प्रा. डॉ. एम. एस. गणाचारी यांनी सांगितले.

Tags: