बेळगाव कर्नाटक राज्योत्सवासाठी राज्य सरकारने दोन कोटींची तरतूद करावी, राज्योत्सव पुरस्कार प्रदान सोहळा बेळगावात घ्यावा अशी मागणी कर्नाटक रक्षण वेदिकेने केली आहे. या मागणीसाठी संघटनेतर्फे बेळगावात आज आंदोलन करण्यात आले.
कर्नाटक रक्षण वेदिकेच्या वतीने आज बेळगावात कर्नाटक राज्योत्सव भव्य स्वरूपात साजरा करण्यासाठी शहरात चन्नम्मा सर्कल ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना करवेचे जिल्हाध्यक्ष दीपक गुडगनट्टी म्हणाले की, कन्नड राज्योत्सव संपूर्ण राज्यात फक्त बेळगावमध्येच उत्साहात साजरा केला जातो, म्हैसूरचा दसरा पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात, त्याचप्रमाणे बेळगावातील राज्योत्सव पाहण्यासाठी राज्यातील विविध जिल्ह्यातून लोक येतात.
यावेळी राज्योत्सव सोहळ्यासाठी राज्य सरकारने दोन कोटी रुपयांचे अनुदान द्यावे, म्हैसूर दसऱ्याच्या धर्तीवर बेळगावात भव्य विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, राज्योत्सव पुरस्कार प्रदान सोहळा बेळगावात व्हावा, कर्नाटक राज्योत्सवादरम्यान महाराष्ट्र एकीकरण समिती काळा दिन पाळते. त्यास राज्य सरकारने परवानगी देऊ नये, असे ते म्हणाले. बाइट.
यावेळी करवेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments