पोलिसांच्या मोठ्या कारवाईत दोन आंतरराज्य चोरांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 8 लाख 59 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम वेणुगोपाल यांनी सांगितले.

शहर पोलीस ठाण्यात वार्ताहरांशी बोलताना ते म्हणाले की, अथणी व नजीकच्या बसस्थानकावर बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशांच्या बॅग व पर्समधील सोन्याचे दागिने चोरून नेत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.त्यावेळी त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली. शहर बस स्थानकावर संशयास्पदरित्या फिरणाऱ्या महिलांची चौकशी केली असता त्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील दोन महिला असल्याचे समोर आले.
त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयाच्या आदेशानुसार हे दागिने हरवलेल्यांना परत करण्यात येणार आहेत.
तसेच अथणी गुन्हे विभागाच्या पथकाने कारवाईत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुरस्कार देणार असल्याचे सांगितले.
अथणी पोलीस ठाण्याचे पीएसआय शिवानंद कारजोळ कर्मचारी पी.बी.नाईका, ए.ए.इरकर, एम.ए.पाटील, जे.एच.डांगे, एम.एन.खोत , श्रीमती जे.आर. असोदे, सविता कट्टी , विनोद ठकन्नवर उपस्थित होते.


Recent Comments