भारतीय संघ गेल्या 12 वर्षापासून विश्वचषक ट्रॉफीची आतुरतेने वाट पाहत आहे. यंदाचा वर्ल्ड कप भारतात होत असल्याने भारतीय संघ विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. मात्र विश्वचषकातील पहिल्या सामन्याअगोदर भारतीय संघाला धक्का बसला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर शुभमन गिलला डेंग्यूची लागण झालीय. त्यामुळे आठ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात शुभमनच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. शुभमनच्या अनुपस्थितीत सलामीला कोणाला उतरवाचे असा प्रश्न सध्या टीम इंडियाला भेडसावत आहे. इशान किशन किंवा केएल राहुल यांची नावे सध्या चर्चेत आहेत.
विश्वचषकात पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्यात येणार आहे. हा सामना 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे होणार आहे. सामन्यात शुभमनच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. त्यामुळे डावाच्या सुरुवातीला शुभमनच्या जागी इशान किशन किंवा केएल राहुल हे दोन पर्याय कर्णधार रोहित शर्मासमोर उपलब्ध आहेत.
परंतु या दोघांपैकी केएल राहुलला संधी देण्याची शक्यता आहे. केएल राहुलच्या कामगिरीवर बोलायचे झाले तर केएल राहुल भारताकडून 16 एकदिवसीय सामन्यात सलामीवीर म्हणून खेळला आहे. या कालावधीत त्याने 669 धावा केल्या आहेत. तसेच या दरम्यान राहुलने दोन शतके आणि पाच अर्धशतकेही झळकावली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतानात्याने सात एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सात सामन्यात त्याने 246 धावा केल्या आहेत.
आशिया चषकात इशान किशनने सावरला होता डाव
इशानच्या कामगिरीविषयी बोलयचे तर आशिया चषकाच्या पहिल्या दोन सामन्याला राहुल अनुपस्थित होता. राहुलच्या अनुपस्थितीत इशान किशन याने पहिल्या दोन्ही सामन्यात विकेटकिपर फलंदाजाची भूमिका पार पाडली होती. पाकिस्तानविरोधात इशान किशन याने झुंजार 82 धावांची खेळी केली होती. आघाडीचे फलंदाज फेल गेल्यानंतर इशान किशन याने डाव सावरला होता.
शुभमन गिलला सरावातून घ्यावी लागली माघार
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमधला सामना रविवारी चेन्नईत खेळवण्यात येत आहे. या सामन्यासाठी भारतीय संघानं काल चिदंबरम स्टेडियमवर कसून सराव केला. पण भारतीय संघाच्या त्या सराव सत्रातून शुभमन गिलला माघार घ्यावी लागली. भारतीय संघानं काल चिदंबरम स्टेडियमवर कसून सराव केला. पण भारतीय संघाच्या त्या सराव सत्रातून शुभमन गिलला माघार घ्यावी लागली.
Recent Comments