युवकांनी सशक्त व निरोगी होण्यासाठी खेळ आवश्यक आहेत.असे हुक्केरी तहसीलदार मंजुळा नाईक म्हणाल्या .


हुक्केरी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन पदवीपूर्व शिक्षण विभागाचे उपसंचालक पी.ए.भंडारे व हुक्केरी क्षेत्र शिक्षणाधिकारी प्रभावती पाटील यांच्या हस्ते रोपांना पाणी देऊन करण्यात आले.
त्यानंतर तालुका दंडाधिकारी मंजुळा नाईक यांनी क्रीडा मशाल प्रज्वलित करून खेळाडूंना शपथ दिली व आजची मुले उद्याचे नागरिक असल्याचे सांगितले.
आपल्या देशाच्या भवितव्यासाठी सशक्त तरुणांची गरज आहे. असे त्यांनी सांगितले . कर्नाटक पब्लिक स्कूल, यरगट्टीचे प्राचार्य किरण चौगला यांनी प्रास्ताविक करून मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला.
मंचावर एसडीएमसी सदस्य मल्लिकार्जुन नंदगावी, सिद्दन्ना नुगीनहाळ , बसवराज पाटील, वीरपक्षी चौगला उपस्थित होते.
क्रीडा स्पर्धेत हुक्केरी तालुक्यातील विविध प्री ग्रॅज्युएट शाळेच्या विद्यार्थ्यांनी खेळात सहभाग घेतला.


Recent Comments