इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागातर्फे बेळगावात येत्या 8 व 9 ऑक्टोबर रोजी ‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचा सदुपयोग’ या विषयावर कार्यशाळा आणि तांत्रिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्सच्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे अध्यक्ष एम नागराज यांनी आज बेळगावात पत्रकार परिषदेत ही माहिती देऊन सांगितले की, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्स ही देशभरातील सिव्हिल, मेकॅनिकल, टेक्स्टाईल आदी 15 विभागातील अभियंत्यांची शिखर संस्था आहे.
1920मध्ये स्थापना झालेल्या या संस्थेला ब्रिटिशांनी सनद दिली असून, देशभरात 2.5 लाखांहून अधिक सदस्य आहेत. राज्ये आणि देशाच्या समस्यांवर अभियांत्रिकी दृष्टिकोनातून पर्याय सुचविण्यासाठी दरवर्षी संस्थेतर्फे विविध राज्यात कार्यशाळा, तांत्रिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार, बेळगावातील केएलई कन्व्हेन्शन सेंटरमध्ये येत्या 8 व 9 ऑक्टोबर रोजी ‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचा सदुपयोग’ या विषयावर कार्यशाळा आणि तांत्रिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.
धारवाड आयआयटीचे संचालक प्रा. डॉ. वेंकप्पय्या देसाई यांच्याहस्ते कार्यशाळा व तांत्रिक प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून इन्फोसिस फौंडेशनच्या संस्थापक-अध्यक्षा पद्मभूषण सुधा मूर्ती, जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी, केएलई सोसायटीचे अध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे, डॉ. टी. जी. सीताराम, शिवानंद रॉय, एम. नागराज यांच्यासह अनेक मान्यवर कार्यक्रमात सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेत बेळगाव विभागाचे अध्यक्ष रमेश जंगल, मानद सचिव प्रा. डॉ. वीरण्णा डी.के. संयोजक सी. बी. हिरेमठ, बी. जी. धरेनवर, एस. वाय. कुंदरगी, एस. एम. मेटी, एन. जी. बागलकोट, बसवराज बालकट्टी, एम. पी. मेत्री, जे नूलिन आदी उपस्थित होते.


Recent Comments