Belagavi

शाळाकॉलेजच्या वेळेत बस सोडण्याची ग्राम पंचायतीची मागणी

Share

येळ्ळूर गाव हे तालुक्यातील मोठे गाव म्हणून ओळखले जाते पण येळ्ळूर मध्ये ज्या बसेस चालू आहेत त्या वेळेवर येत नाहीत, गर्दीमुळे विद्यार्थ्यांना बसमध्ये उभं राहायला ही जागा नसते. अशात काही विध्यार्थ्यांना तिही बस सोडावी लागते त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असुन कॉलेज विध्यार्थ्यांना याचा फटका बसत आहे.

सकाळी, 6:30,7:00, 7:30 , या वेळेत.तसेच 8:30, 9:00, 9:30,10:00, 10:30 या वेळेत शाळा कॉलेजेसना जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि कामावर जाणाऱ्या लोकांसाठी या बसेस वेळेत असणे सोयीस्कर गरजेचे आहे .

त्यामुळे या सर्व बाबींची गांभीर्याने दखल घेऊन येळ्ळूर ग्राम पंचायतीकडून केएसआरटीसी, डि सी श्री गणेश राठोड यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की येळ्ळूर गावासाठी वेळेवर बसेस सोडाव्यात यावे व गावातील विध्यार्थी व नागरिकांची गैरसोय दूर करावी

निवेदन देतेवेळी ग्राम पंचायत उपाध्यक्ष प्रमोद पाटील माजी अध्यक्ष सतीश बा. पाटील, ग्राम पंचायत सदस्य शिवाजी नांदूरकर, रमेश मेनसे.उपस्थित होते. यावेळी या समस्येवर लवकरात लवकर तोडगा कडू असे अधिकारी म्हटले

Tags: