Banglore

बेंगळूरमध्ये सगळीकडेच वाहतूक नियंत्रित करणे अशक्य : डीकेशी

Share

बीबीएमपीने पोलिसांना विश्वासात घेऊन रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची कारवाई करावी. बेंगळूरमध्ये सगळीकडेच वाहतूक नियंत्रित करणे अशक्य आहे. ठिकठिकाणचे सर्वच खड्डे बुजवणे शक्य नाही, किरकोळ समस्या आहेत, असे उपमुख्यमंत्री व बेंगळूर विकास मंत्री डीके शिवकुमार यांनी म्हटले आहे.

विधानसौध येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, ‘शहरात सध्या पाऊस थांबला असून, तो पुन्हा सुरू होईल, असा अंदाज आहे. त्यापूर्वी सर्व कामे पूर्ण करण्याच्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. परवानगी असलेली कामे थांबली आहेत, ती पुन्हा सुरू करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करावे. जनतेने खड्डयांबद्दल अधिकाऱ्यांना माहिती द्यावी. ते तातडीने बुजवण्याचे काम आम्ही करू. संपूर्ण बंगळुरूमध्ये खड्डे बुजवणे अवघड झाले आहे. मात्र, आम्ही प्रमुख रस्त्यावरील खड्डे प्राधान्याने बुजवू. 250 कोटींचा एनडीआरएफचा निधी आहे, तोही आम्ही वापरला आहे. कॉरिडॉर सुधारण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या, बोगदे आणि ग्रेड सेपरेटरसाठी आंतरराष्ट्रीय बोली मागविण्यात आली होती.

यामध्ये 9 कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. त्यापैकी 8 लोक निविदांसाठी पात्र आहेत, आम्ही 45 दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण करू,’
जिथे रहदारी आहे, त्याच्या व्यवस्थापनाबाबत अहवाल द्यावा; काहींनी मूळ योजना आणून दाखवली. आम्ही त्यांना दोन महिन्यांची मुदत दिली आहे. त्यांनी पूर्ण आराखडा दिल्यानंतर आम्ही निविदा देऊ. बेल्लारी रोड, जुना मद्रास रोड, ट्रिनिटी सर्कल, यमलुरू जंक्शन, बन्नेरघट्टा रोड, म्हैसूर रोड, मागदी रोड, यशवंतपुरा जंक्शन, गोरगुंटेपाल्या इत्यादी एकूण 190 किमीच्या विकासासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. त्यासाठी कंपन्यांनी योग्य योजना द्यावी. चार मार्गिक बोगद्याचा रस्ता आवश्यक आहे. त्यामुळे आम्ही सर्व काळजी घेऊ.

Tags: