हुक्केरी हिरेमठचा दसरा उत्सव येत्या ऑक्टोबर महिन्याच्या १५ ते २४ तारखेपर्यंत संपूर्णपणे साजरा केला जाणार आहे .

हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या दसरा उत्सवात राज्य व परदेशातील लोक सहभागी होणार आहेत. कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांना हुक्केरी हिरेमठ येथील श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी या समारंभात पुरस्काराच्या अध्यक्षतेसाठी आमंत्रित केले आहे
कर्नाटक राज्याचे उपमुख्यमंत्री डी.के.शिवकुमार यांनी आमंत्रण स्वीकारले आणि म्हणाले कि , आम्ही हुक्केरी हिरेमठ बद्दल खूप ऐकले आहे आणि बेळगाव येथील हुक्केरी हिरेमठ शाखेला भेट दिली आणि श्रींचे आशीर्वाद घेतले. आता मला दसरा उत्सवात सहभागी होण्याचे भाग्य लाभत आहे. हुक्केरी हिरेमठ तसेच श्री डॉ. करीबसव देशेंद्र महास्वामी ज्यांची मी उपासना करतो . या कार्यक्रमात मी नक्कीच सहभागी होणार आहे.”
यावेळी रामदुर्गचे आमदार अशोक पट्टण , निप्पाणीच्या आमदार शशिकला जोल्ले, काँग्रेस नेते आनंद गड्डदेवरमठ, हुक्केरी हिरेमठाचे विद्यार्थी, शीतल बाली, सुरेश जिनराळे , चन्नाप्पा गजबर आदी उपस्थित होते.


Recent Comments