Belagavi

डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता, काळजी घ्या :आरोग्यमंत्री दिनेश गुंडुराव

Share

कर्नाटकात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे डेंग्यू आजाराबाबत दक्षता घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. प्रत्येक घराचे सर्वेक्षण करून त्यांच्या आरोग्याची तपासणी केली जाईल, असे आरोग्यमंत्री दिनेश गुंडुराव यांनी सांगितले.

बेळगाव येथील सुवर्ण विधान सौधा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आरोग्यमंत्री दिनेश गुंडुराव म्हणाले की, प्रत्येक घराचे सर्वेक्षण करून त्यांच्या आरोग्याची तपासणी केली जाईल. मधुमेह आणि डेंग्यू आजाराबाबत काळजी घेण्याच्या सूचना मी विभागाला दिल्या आहेत. आठ जिल्ह्यांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. शासकीय रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्यांना कामकाजाचा कालावधी संपल्यानंतर इतरत्र काम करता येते, त्यांनी आमच्या वेळेतच काटेकोरपणे काम करावे, असेही ते म्हणाले.

आमच्या सरकारकडे प्रचंड बहुमत असून जनतेला चांगले प्रशासन देत आहे. भाजपच्या शब्दाला किंमत नाही. आमचे सरकार राज्य समृद्ध करेल. आमचे सरकार पडेल असे भाजप वेड्यासारखे बोलत आहे. भाजपच्या आरोपात तथ्य नाही. बाइट
बेळगाव जिल्ह्यातील गोकाक येथे खासगी रुग्णालय चालविणारे आरोग्य विभागातील तज्ज्ञ डॉक्टर डॉ. जगदीश जिंगे हे सध्या बेळगाव जिल्ह्यात अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, मात्र ते शासकीय यंत्रणेचा गैरवापर करत असल्याची माहिती कानावर आली आहे. शासकीय वाहनाने गोकाक येथील खाजगी रुग्णालयात जात आहेत. याबद्दल चौकशी करण्यात येईल असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी आरोग्य खात्याचे अधिकारी उपस्थित होते.

Tags: