विजेच्या धक्क्याने वायरमनचा मृत्यू झाल्याची घटना पट्टणकुडी गावात घडली.
उमेश श्रीकांत पाटील (४०) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी खडकलाट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निप्पाणी-चिक्कोडी रस्त्यावरील हालसिद्धनाथ मंदिर परिसरात कृषी वाहनाला वीज जोडणी करत असताना शोक लागून तो जागीच कोसळला. त्यांना तातडीने निपाणी येथील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.मृत वायरमनच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ असा परिवार आहे.
Recent Comments