Khanapur

बेकवाड ग्रामपंचायतीला गांधी ग्राम पुरस्कार प्रदान

Share

खानापूर तालुक्यातील बेकवाड ग्रामपंचायतीची यंदाच्या गांधी ग्राम पुरस्कारासाठी निवड झाली असून, बंगळुर येथे झालेल्या गांधी जयंती कार्यक्रमात ग्रामपंचायतीला या पुरस्काराने गौरविण्यात आले.

या पुरस्कार प्रदान समारंभाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री प्रियांक खर्गे होते. यांच्याहस्ते बेकवाड ग्राम पंचायतीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी पंचायत विकास अधिकारी नागप्पा बन्नी, सभापती मोहिनी येळ्ळूरकर, उपाध्यक्षा शबाना मुजावर आणि इतरांना गांधी ग्राम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

शासनाच्या आदेशानुसार खानापूर तालुक्यातील बेकवाड ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेला सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले असून ग्रामविकासावर भर देण्यात आला आहे. त्याची दखल घेऊन राज्य शासनाने या ग्रामपंचायतीला गांधी ग्राम पुरस्काराने सन्मानित करून विकासात सहकार्य करण्यास प्रोत्साहित केले आहे.

यावेळी ग्राम पंचायतीचे सचिव महांतेश खणगावी,सदस्य यल्लाप्पा गुरव, गजानन पाटील, गुणवंती तळवार, संजय कोलकार, परशुराम मडवाळकर, नामदेव कोलकार, रुक्मान्ना झुंजवाडकर, गंगू तळवार, ज्योती गुरव, नूतन भुजगुरव आणि बेकवाड ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते.

Tags: