Belagavi

रमेश कत्ती काँग्रेसमध्ये येणार असल्याची माहिती नाही : मंत्री सतीश जारकीहोळी

Share

भाजपचे माजी खासदार रमेश कत्ती काँग्रेसमध्ये येणार असल्याचा मुद्दा माझ्या निदर्शनास आलेला नाही असे सार्वजनिक खात्याचे व बेळगाव जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

बेळगाव विमानतळावर मंगळवारी पत्रकारांशी बोलताना मंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, आमच्या पक्षाची विचारधारा जो कोणी स्वीकारेल त्याचे स्वागतच आहे. पण रमेश कत्ती काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मला नाही.

जानेवारी आणि संक्रांतीपर्यंत सरकार सत्तेत राहणार, त्यानंतर पडणार असल्याच्या माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, तोपर्यंत सरकार राहील ना हे पाहू. धनगर (कुरुबर) समाजाला एसटी समुदायात समाविष्ट करण्याच्या प्रश्नावर उत्तर देताना त्यांनी ते केंद्र सरकारवर अवलंबून असल्याचे सांगितले. राज्य सरकारचे काम केवळ केंद्राकडे शिफारसी करणे आहे असे ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत तुमचा मुलगा किंवा मुलगी चिक्कोडी की बेळगाव मतदारसंघातून निवडणूक लढवणार, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, अद्याप निर्णय झालेला नाही. पक्षाच्या प्रथेप्रमाणे मुलाखती, पक्षासाठी केलेले काम पाहून पक्षश्रेष्ठी यावर निर्णय घेतील असे त्यांनी सांगितले

Tags: