अखिल कर्नाटक माजी सैनिक संघटना जिल्हा युनिट बेळगाव तर्फे मुतगा कन्नड माध्यम शाळा व शासकीय रुग्णालयाच्या प्रांगणात 02 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छ भारत अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.
बेळगाव जिल्ह्यातील सर्व माजी व सेवेत असलेले सैनिक व सैनिकांच्या कुटुंबीयांनी सहभाग घेऊन समाजातील लोकांना स्वच्छता मोहिमेची जाणीव करून दिली.
यावेळी ऑल कर्नाटक माजी सैनिक संघटना जिल्हा युनिट बेळगावचे अध्यक्ष बसप्पा तलवार, मानद अध्यक्ष एन कळसन्नावर, उपाध्यक्ष विरुपाक्षी थिलगंजी, अरुण मुरगोड, शंकर शिंधी, केम्पना लुकन्नावर, शंकर आर जी, बसवराज संतरी, महालिंगप्पा, अशोक पिलिगेर, अशोक पिलिगेर, डॉ. नागेश अनगोळकर . मडिवळप्पा हुलकवी यांच्यासह सर्व कर्नाटक माजी सैनिक संघटना बेळगावचे सर्व सदस्य उपस्थित होते.


Recent Comments