Belagavi

दंगलखोरांवर गय न करता कठोर कारवाई करू : मुख्यमंत्री सिद्धरामय्या

Share

आमच्या सरकारमध्ये जे कोणी जातीय दंगली घडवून आणतील त्यांच्यावर आम्ही कोणतीही गय न करता कठोर कारवाई करू असा इशारा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिलाय.

मंगळवारी बेळगाव विमानतळावर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, शिमोगा येथील जातीय दंगल सरकारने गांभीर्याने घेतली आहे. दंगलखोरांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
कोलार येथे भाजपला निषेध करू द्या. लोकशाहीत आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. ते शांततेने होऊ दे.

आमच्या सरकारमध्ये कोणत्याही समाजावर अन्याय होत नाही. ज्येष्ठ आमदार शामनूर शिवशंकरप्पा यांनी काहीही म्हटले असले तरी आम्ही सर्व समाजाला समान न्याय दिला आहे, असे ते म्हणाले.
बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, यावर चर्चा करू असे ते म्हणाले.

Tags: