Banglore

आमचे सरकार धर्मनिरपेक्ष सरकार : सिद्धरामय्या

Share

आमचे सरकार सर्व जातींना समान वागणूक देते. अन्नभाग्य, शक्ती, गृहज्योती, गृहलक्ष्मी योजना जातीच्या आधारावर दिल्या जात नाहीत असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ठणकावले आहे.

मुख्यमंत्र्यांनी शामनूर शिवशंकरप्पा यांचे विधान गांभीर्याने घ्यावे या माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या विधानावर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली. आमचे सरकार धर्मनिरपेक्ष सरकार आहे, अन्नभाग्य, शक्ती, गृहज्योती,

गृहलक्ष्मी योजना जातीच्या आधारावर दिल्या नाहीत. सर्व जातींना समान वागणूक दिली जाते असे ते म्हणाले. बाइट
सहा महिन्यांत सरकार पडणार या माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांच्या विधानावर प्रतिक्रिया

देताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी एचडी कुमारस्वामी यांची थट्टा केली. ते निराश झाले आहेत. युतीचे सरकार येईल. आपण मुख्यमंत्री होणार असे त्यांना वाटत होते. पण आता त्यांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे ते असे वक्तव्य करत आहेत, असे ते म्हणाले.बाइट

Tags: