Belagavi

अध्यात्म बदलू शकते माणसाचे जीवन : अध्यात्मिक गुरु डॉ. अभिमन्यू यांचे मत

Share

अध्यात्म माणसाचे जीवन बदलू शकते. ताणतणावाचा सामना करण्यासाठी आजकाल बरेच लोक अध्यात्माकडे झुकत आहेत असे अध्यतनीक गुरु व मानसोपचार तज्ज्ञ डॉ. अभिमन्यू यांनी सांगितले.

बेळगाव येथील शिवबसव नगर येथील केपीटीसीएल हॉलमध्ये दोन दिवसीय अध्यात्मिक समुपदेशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर अभिमन्यू गुरुजी यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, माझ्याकडे क्लिनिकल सायकोलॉजीमध्ये मास्टर आणि फिलॉसॉफीमध्ये डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पदवी आहे. वाचन आणि लेखन हा मला छंद आहे. बरेच लोक अध्यात्माकडे झुकत आहेत. अध्यात्म जीवन बदलू शकते.

देवाने दिलेली देणगी, मानवी शरीर सुरक्षित ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अध्यात्मिक विचारातून जीवन सुंदरपणे जगता येते असे ते म्हणाले.

मानसिक आणि कामाच्या तणावात माणूस नैराश्यात जातो. एखादी व्यक्ती नेहमी कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त असते. त्यांची समस्या सोडवण्यासाठी अध्यात्म मदत करेल, असे ते म्हणाले. प्रत्येकाला आध्यात्मिक चिंतनाची जाणीव करून देणे जवळजवळ अशक्य आहे. आध्यात्मिक प्रवृत्ती हवी. त्यातून खूप काही शिकता येईल, असे ते म्हणाले.

Tags: