ईद मिलाद उत्सवाचा एक भाग म्हणून चिक्कोडी तालुक्यातील मांजरी येथील मुलांसाठी कुराण पठण तसेच महम्मद पैगंबर यांच्या जीवन इतिहासावर भाषण आयोजित करण्यात आले होते.

महम्मद पैगंबर यांच्या जयंतीचा एक भाग म्हणून साजरी होणारी ईद मिलाद मांजरी गावात अर्थपूर्ण पद्धतीने साजरी करण्यात आली. मुस्लीम समाजाचे नेते झाकिर तराल यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला.
तसेच ईद मिलादचा एक भाग म्हणून लहान मुलांसाठी कुराण पठण, महम्मद पैगंबर यांच्या जीवन इतिहासावर भाषणाचा कार्यक्रम झाला.त्यात 80 हून अधिक मुलांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात त्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आलेले मौलाना इब्राहिम तराल म्हणाले की, मांजरी गावात ईद मिलाद कार्यक्रमात लहान मुलांसाठी कुराण पठण व प्रेषित महंमद पैगंबर यांच्या जीवन इतिहासावर भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली हे कौतुकास्पद आहे.
यावेळी जाकीर तराल, हैदेर तराल, इस्माईल दादीवाले, इब्राहिम मुल्ला, शकीला मुल्ला, बाबासाहेब कोथळी, सुलेमान तराल, मौलाना आशिफ, मुनिर कोथळी, मौलाना मीरा आदी उपस्थित होते.


Recent Comments