राज्य सरकारने राज्यातील 13 केएएस आणि अन्य 13 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. राज्य सरकारी कर्मचारी आणि प्रशासकीय सुधारणा विभागाच्या अपर सचिव उमादेवी यांनी हा आदेश जारी केला आहे.

यामध्ये धारवाड येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे भूसंपादन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले व यापूर्वी चिक्कोडी येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले एस. एस. संपगावी यांची चिक्कोडी उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्या आयएएस अधिकारी माधव गीते हे गेल्या काही महिन्यांपासून चिक्कोडी येथे उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. तसेच चिक्कोडी व सदलगा नगरपालिकेचे प्रशासक म्हणून काम पाहिले.
सुभाष संपगावी यांना चिक्कोडी तहसीलदार म्हणून काम करण्याचा अनुभव आहे
या आदेशात चिक्कोडी येथे कार्यरत असलेले उपविभागीय अधिकारी माधव गीते यांच्या बदलीच्या जागेचा उल्लेख नाही.


Recent Comments