Chikkodi

ऑटो रिक्षाची इनोव्हा कारला धडक : प्रवासी वृद्ध महिलेचा मृत्यू

Share

चिक्कोडी शहरातील महावीर नगरजवळ ऑटो रिक्षा इनोव्हाला धडकल्याने ऑटोमध्ये असलेल्या राजीव नगर येथील लक्ष्मी कत्ती (६६) यांचा जागीच मृत्यू झाला.

लक्ष्मी कत्ती या ऑटोने बाजारातून घरी परतत असताना हा अपघात झाला. ऑटो चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक तालुका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
अपघात होताच इनोव्हाचा चालक घटनास्थळी कार सोडून पळून गेला, याप्रकरणी चिक्कोडी वाहतूक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: