Belagavi

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ‘बीम्स’ हॉस्पिटलमध्ये स्वच्छता सेवा अभियान

Share

बेळगाव येथील सरकारी बीम्स रुग्णालयात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ‘रुग्णालयातील स्वच्छतेला आमचे प्राधान्य’ या अभियानाला चालना देण्यात आली.

बेळगाव जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, जिल्हा आरोग्य, कुटुंब कल्याण विभाग, बेळगाव वैद्यकीय विज्ञान महाविद्यालय, जिल्हा सर्वेक्षणाधिकारी कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, यांच्या संयुक्त विद्यमाने बीम्स हॉस्पिटल आवारात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

यावेळी बोलताना जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोणी म्हणाले की, ‘रुग्णालयाची स्वच्छता, आमचे प्राधान्य’ हे अभियान सुरू केले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, बेळगाव, जिल्हा आरोग्य, कुटुंब कल्याण विभाग, बेळगाव वैद्यकीय विज्ञान महाविद्यालय, जिल्हा सर्वेक्षणाधिकारी कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांचा सहयोग लाभला आहे. 17 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येत आहे.

प्रत्येक गावात जाऊन आरोग्य सेवा देण्याचा कार्यक्रम आखण्यात आला आहे, आम्ही सर्व गरीब लोकांना आयुष्मान भव कार्ड देऊ आणि आम्ही स्वच्छता मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक आरोग्य केंद्रात स्वच्छता राखणे हा मुख्य उद्देश असून या मोहिमेत जनतेनेही हातभार लावावा.

यावेळी बीम्स संचालक आर. जी. विवेकी, अण्णासाहेब पाटील, विश्वनाथ भोवी, विठ्ठल शिंदे, महाविद्यालयाचे प्राचार्य एल. एस. पंगन्नवर, संजय दोड्डमणी, एम. एस. पल्लेद, गीता कांबळे आदी उपस्थित होते

Tags: