Vijayapura

विजयपुरात सार्वजनिक गणेश मुर्त्यांची जल्लोषात विसर्जन मिरवणूक

Share

काल रात्री, गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी , उशिरा रिमझिम पावसातही डीजेच्या तालावर नृत्य करीत , विजयपूरमध्ये सर्व गणेशमूर्ती विसर्जन करण्यात आल्या ..

विजयपुरमध्ये सातव्या दिवशी गणेश विसर्जन करण्यात आले . गेल्या सात दिवसांपासून सार्वजनिक गणेश मंडळांनी आपल्या मंडपांमध्ये , प्रतिष्ठांपित केलेल्या श्रीगणेशाला निरोप दिला. विजयपुर शहरात ताज बौडीमध्ये गणेशाचे विसर्जन जल्लोषात करण्यात आले. ताज बौडी परिसरात महापालिकेने बांधलेल्या कृत्रिम खड्ड्यात हे विसर्जन करण्यात आले. क्रेनद्वारे गणेशमूर्ती विसर्जन व्यवस्था करण्यात आली होती. भक्तांनी पुढच्या वर्षी लवकर या असा जयघोष केला.

रात्री उशिरा शहरात मुसळधार पाऊस सुरू झाला. मुसळधार पावसातही भाविकांनी मिरवणूक सुरू ठेवली. सिद्धेश्वर मंदिर, गांधी सर्कल आणि शिवाजी सर्कलमधील गणेश मंडळांच्या गणेशाच्या सन्मानार्थ सार्वजनिक गणेश मंडळांनी आरती केली होती.

मिरवणुकीत डीजेच्या दणदणाटात काही गणेश मंडळांच्या तरुणांनी पारंपरिक नृत्य केले . रात्री उशिराही गणेशभक्तांसाठी प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रसादाची व्यवस्था उप्पिट, पोहे आणि मसाला भाताच्या स्वरूपात करण्यात आली होती. दुचाकी व चारचाकी वाहने प्रवेश करू नयेत यासाठी शहरातील प्रमुख रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

विजयपूर शहरातील 525 सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेश विसर्जन केले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली होती. विजयपूर शहरातील जनतेने गणपती बाप्पाना मोठ्या जल्लोषात निरोप दिला.

Tags: