ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान यांना या वर्षाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे.
अनुराग ठाकूर यांनी एक ट्वीच शेअर केले आहे. या ट्वीटच्या माध्यमातून त्यांनी दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा केली आहे.
अनुराग ठाकूर यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, “वहीदा रेहमान यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल यावर्षीचा प्रतिष्ठित दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. हे जाहीर करताना मला खूप आनंद आणि सन्मानाची भावना आहे. वहीदा रेहमान यांच्या हिंदी चित्रपटांमधील भूमिकांची समीक्षकांनी प्रशंसा केली आहे. त्यापैकी प्यासा, कागज के फूल,
चौदहवी का चाँद, साहेब बीवी और गुलाम, खामोशी आणि इतर अनेक चित्रपट आहेत. 5 दशकांहून अधिक काळाच्या त्यांच्या कारकिर्दीत, त्यांनी अनेक भूमिका अत्यंत चोखंदळपणे साकारल्या आहेत. रेश्मा आणि शेरा या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्कारप्राप्त, वहीदाजी यांनी समर्पण, वचनबद्धता आणि एका भारतीय नारीच्या सामर्थ्याचे उदाहरण दिले आहे.”
“मी त्यांचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या समृद्ध कार्याला नम्रपणे अभिवादन करतो जे चित्रपटाच्या इतिहासाचा एक अंगभूत भाग आहे.” असंही त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
गेल्या वर्षी आशा पारेख यांना दादासाबेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आता यंदाचा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार वहीदा रहमान यांना जाहीर करण्यात आला आहे.
वहीदा रहमान यांचे चित्रपट
वहीदा रहमान यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. वहीदा रहमान यांनी डान्सर म्हणून अलिबाबावम 40 थिरुदरगलम या तमिळ चित्रपटातून अभिनयात पदार्पण केले. एक फूल चार काँटे, चाँदनी,दिल्ली 6,बीस साल बाद या चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या भूमिकेचे अनेकांनी कौतुक केले.
Recent Comments