Belagavi

बेळगावच्या प्रशांत खन्नूकरने पटकावला मानाचा श्री गणेश किताब

Share

मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, झेंडा चौक, बेळगाव आणि बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटना आयोजित १९व्या श्री गणेश आंतरराज्य शरीरसौष्ठव स्पर्धेतील मानाचा श्री गणेश किताब बेळगावच्या प्रशांत खन्नूकरने पटकावला. बेळगावच्या निखिल दंडगलकरने पहिले उपविजेतेपद तर गोव्याच्या एस. खानने बेस्ट पोझरचा किताब पटकावला.

स्वर्गीय श्री प्रेमराज चिंडक, प्रेमळ मेमरी ट्रॉफी श्री गणेश बॉडीबिल्डिंग स्पर्धा कर्नाटक गोवा राज्य आणि कोल्हापूर जिल्ह्यासाठी 24 सप्टेंबर 2023 रविवार रोजी रामनाथ मंगल कार्यालयात घेण्यात आली. आयबीबीएफ, मुंबईच्या मान्यतेनुसार ५५, ६०, ६५, ७०, ७५, ८० व त्यावरील अशा एकूण ७ वजनी गटात ही बॉडीबिल्डिंग स्पर्धा घेण्यात आली. त्यात १२५हुन अधिक स्पर्धकांनी भाग घेतला.

याप्रसंगी शिरीष गोगटे, अविनाश पोतदार, टिळकवाडी पोलिस स्टेशनचे सीपीआय पुजारी, बाप्पा वेर्णेकर, राजेंद्र कदम, सुहास चिंडक, पंकज नवीन कुमार, अमित किल्लेकर, जीडी भट, राजेश हंगिरगेकर, गिरीश पाटणकर, मिलिंद पाटणेकर, प्रदीप सिद्धन्नवार, विकास कलघटगी, सचिन हंगिरगेकर, मोतीचंद दोरकाडी, अजित सिद्दन्नावर तसेच प्रायोजक एमएसबी न्यूट्रिशनचे पंकज, ऍड. अमजद जमादार उपस्थित होते.

यावेळी पाहुण्यांच्या हस्ते विविध वजनी गटात यश मिळवलेल्या शरीरसौष्ठवपटूंचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

Tags: